बंधु-भगिनींना सप्रेम नमस्कार.....
या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याशी माझे मनोगत व्यक्त करतांना मला आनंद होत आहे.
गेल्या सुमारे २५-३० वर्षातील माझ्या सार्वजनिक जीवनात शैक्षणिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तीशी माझा संपर्क झाला. या सर्वांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, काम करणाऱ्या पद्धतीचा आणि त्या कामाच्या बऱ्या वाईट निष्कर्षांचा, मला माझी सामाजिक-सांस्कृतिक, शैक्षणिक राजकीय घडविण्यात चांगला उपयोग झाला, आणि त्यामुळे गेल्या २५-३० वर्षात माझ्याकडून जी काही समाज हिताची कामे झाली, त्यात मी निदान पास होण्यापुरते गुण मिळवू शकलो असेन असा मला विश्वास वाटतो. तीन दशकांच्या या वाटचालीत जी काही चांगली कामे असमानधारकारक झाली असतील त्याची मोठी जबाबदारी स्वतःकड़े घेणे हे मी लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य मानतो. माझ्या नेतृत्वाला त्रुटींमुळेच अशी कामे यशस्वी होऊ शकली नसावीत अशी माझी धारणा आहे.
वसई-विरार परिसरात “वसई विकास मंडळ” आणि अन्य काही संस्थाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक उपक्रम राबवीले जातात. विरार शहरात प्रथम शाळा, नंतर महाविद्यालय आणि आता अभिमत विद्यापीठाकडे आम्ही वाटचाल सुरु केली आहे. मीरा रोड ते डहाणू परिसरातल्या कोणत्याही शाखेतल्या विध्यार्थ्यास शिक्षणासाठी मुंबई कडे धाव घ्यावी लागू नये, हे उदिष्ट सुरुवातीपासून मनाशी बाळगून अनेक अडचणीत आणि अडथळे पार करून आम्ही ध्येयपूर्तीच्या जवळ पोहोचलो आहोत. अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे याची जाणीव मला नक्कीच आहे. आपल्या सहकार्याने हा पल्ला मी यशस्वीपणे गाठणार असा आत्मविश्वासही आहे.